पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] खडकीतील रेशन दुकानात धान्याचा अवैधरीत्या साठा असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाल्यानंतर यावर धडक कारवाई करण्यात आली.पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई सोमवार (ता.३०) रोजी पुणे विभाग कार्यालयातील तहसीलदार सुनंदा भोसले व विभागीय गोदाम निरीक्षक संतोष सरडे हे दुपारी एक वाजण्याच्या वेळेस रास्तभाव दुकान परवानाधारक शिलाबेन दिलीपकुमार शहा यांच्या दुकानात पोचले.त्यांच्यासह अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेखा माने, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी अपर्णा तांबोळी, परिमंडळ अधिकारी ‘क’ विभाग (प्रभारी) गजानन देशमुख, पुरवठा निरीक्षक ‘क’ विभाग स्नेहल गायकवाड यांच्या उपस्थितीत रास्तभाव दुकानाची तपासणी केली. सरकारी धान्य साठ्याची मोजणी करून हा धान्यसाठा पंचनामा करून सील करण्यात आला. या कारवाईमुळे रास्त भाव दुकानदारांचे धाबे दणाणले असून गोरगरिबांच्या हक्काच्या धान्याचा कोणी काळाबाजार करत असेल तर त्याविरुद्ध खडक कारवाई

पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान दुकानात पुस्तकी साठ्यापेक्षा ३०.०४ क्विंटल गहू व १४१.५० क्विंटल तांदूळ, असा एकूण १७१.५४ क्विंटल अतिरिक्त धान्य साठा सापडला. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये खडकी पोलिस ठाण्यात परिमंडळ अधिकारी ‘क’ विभाग (प्रभारी) गजानन देशमुख यांनी गुन्हा दाखल केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *