पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] महागाईची झळ बसणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा चटका बसणार आहे कारण अमुल दुधाच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे ही भाववाढ लगेच लागू होणार आहे. या वाढीनंतर अमूल गोल्डचे दर प्रतिलिटर ६६ रुपये, अमूल फ्रेश ५४ रुपये प्रति लिटर, अमूल गायीचे दूध ५६ रुपये आणि अमूल म्हशीचे दूध आता ७० रुपये प्रतिलिटर होणार आहे. अमूलने गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली त्यानंतर अमूलने यंदा सुरुवातीलाच दुधाच्या दरात वाढ केली आहे.तर डिसेंबरमध्ये मदर डेअरीने दिल्ली एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती.

नविन दरानुसार ग्राहकांना अर्धा लिटर अमूल ताज्या दुधासाठी २७ रुपये मोजावे लागतील. अमूल गोल्डच्या अर्ध्या लिटरसाठी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गायीच्या अर्धा लिटर दुधासाठी २८ रुपये तर अर्धा लिटर अमूल ए2 म्हशीच्या दुधासाठी ३५ रुपये किंमत असेल.उत्पादन आणि खर्चात वाढ झाल्याने अमूल दुधाच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाऱ्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की,मिळणारे दुधाची किंमतीत वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या किमतीत 9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *