थेऊर (हवेलीनामा वृत्तसमुह) संतोष जगताप खुन खटल्याची सुनावणी सुरु असल्याने केसमधील मुख्य साक्षीदारांच्या साक्षीवर यातील सर्व आरोपींना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे या गोष्टीची कल्पना असल्याने यातील मुख्य साक्षीदारांना संपवुन टाकण्याचा कट रचला होता. त्याप्रमाणे त्यांनी कोर्ट पेशीचेवेळी मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देवुन अटक आरोपींना त्यांच्या बाहेर असलेल्या हस्तकांमार्फत अग्निशस्त्र पुरवले असल्याची बातमी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व त्यांचे पथकाला मिळाली त्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहाय्यक आयुक्त संदिप कर्णीक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमित गोरे यांच्या पथकातील पो. हवा. नितीन गायकवाड, सुदर्शन बोरावके, पो.ना. अमित साळुंके, पो. ना. देवीकर, पोना नागलोत, पोना जाधव, पोशि गणेश भापकर, पोशि विर, पोशि शिरगीरे, पोशि कुदळे, म.पो.शि. फणसे यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचुन आरोपींना अटक करुन त्यांचा कट उधळुन लावला आहे.लोणीकाळभोर पोलीस स्टेशन ने दाखवीलेल्या सतर्कतेमुळे, सुपारी देऊन कुविख्यात टोळीकडून होणाऱ्या साक्षीदारांचे खुनाचा कट उधळला व दोघांचा जिव वाचला.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये सन २०२१ मध्ये संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक यांचा पुणे सोलापूर महामार्गावर भर रस्त्यामध्ये गोळीबार करुन खुन करण्यात आला होता.या घटनेमध्ये समोरासमोरील गोळीबारामध्ये तीघांचा जिव गेला होता. गुन्हयातील अनेक साक्षीदारांपैकी महत्वाचे साक्षीदारांना संपविण्याचा कट संतोष जगताप खुन खटल्यातील मुख्य आरोपींनी शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आल्यानंतर त्यांचे जवळचे मित्रांना काही लाख रुपयांची सुपारी देऊन रचला होता.अशी बातमी लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांना मिळाली होती. त्यावर मागील काही दिवसांपासुन या अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस आरोपीतांचा शोध घेत होते.. दि. २८/०१/२०२३ रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे पोलीस शिपाई निखील पवार यांना मिळालेल्या खात्रीशिर बातमीवरुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशनने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दत्तवाडी रोड, सरकारी दवाखान्याजवळ ऊरुळीकांचन, पुणे याठिकाणी सापळा रचुन अग्निशस्त्र व तिक्ष्ण हत्यारासह दोघांना पकडले.त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस एक धारदार चाकु अशी घातक हत्यारे जप्त करणेत आली आहेत. १) आशिष अनिल वरगडे वय २२ वर्षे रा. आश्रमरोड, उरुळीकांचन, पुणे २) उध्दव राजाराम मिसाळ वय ४५ वर्षे रा. दत्तवाडी, उरुळीकांचन, पुणे ३) सुरज सतिष जगताप रा. गणेशवाडी, वरवंड, पुणे ४) किशोर ऊर्फ शिवा छबु साळुंके रा. बोरीपार्थी, केडगाव, पुणे यांना अटक करणेत आली आहे, न्यायालयाकडुन ४ दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे.

पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *