पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] महानगरपालिकेच्या मिळकत कराच्या धर्तीवर आता जमीन विषयक महसूल कर अर्थात शेत सारा देखील ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे याची प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 314 गावाची निवड करण्यात आली असून गाव नमुन्याचे विदा भरण्याचे काम सुरू आहे शेत सरा भरण्याची ऑनलाईन नोटीस बजावली जाणार असून ऑनलाइन कर भरता येणार आहे शेतसारा हा पारंपारिक आहे तो इंग्रजांच्या काळापासून जमिनीवर कर लावण्यास सुरुवात झाली पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता त्यामध्ये कालानुरूप प्रगती होत गेली आणि नवनव्या कराची आकारणी सुरू झाली परंतु जमिनीवर आकारल्या जाणाऱ्या कराची वसुली आजही सुरू आहेच जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी केली जाते शेतीचा कर हा अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित प्रमाणे होत नाही त्यामुळे थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर मोठा वाटतो थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते तसेच आता घरबसल्या ऑनलाईन शेत चारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयात सुद्धा नागरिकांना जावे लागत नाही त्यामुळे हा कर वसूल होत नाही
शेत सारा ऑनलाईन भरण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 314 गावाची निवड करण्यात आली आहे सद्यस्थितीत गाव नमुनेची माहिती संगणक प्रणाली मध्ये भरण्याचे काम सुरू आहे या संविधान मुळे सर्वेक्षण क्रमांक निहाय किंवा खाते निहाय वार्षिक शेतकऱ्याची रक्कम किती होत आहे थकीत कर किती आहे याची माहिती संगणकावर मिळणार असून कर ऑनलाईन भरता येणार आहे अस कुळ कायदा शाखा उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.
