पुणे [हवेलीनामावृत्तसमुह] सोलापूर -पुणे महामार्गावर यवत जवळील माणगाव सीएनजी पंपासमोर आज पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला यात एक खाजगी वस रस्त्याच्या बाजुस उभ्या अवजड वाहणावर पाठीमागून धडकला यात चार जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. अपघातात १५ जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सोलापूरहून पुण्याकडे जाणारी एक खाजगी बस जात होती. सर्व प्रवासी झोपेत असताना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील सीएनजी पंपाजवळ बसचा टायर फुटल्याने हा अपघात घडला. एक ट्रक रस्त्यात थांबलेला होता बसचालकाला हा ट्रक उशीरा दिसला़ त्याला चुकवून पुढे जाताना चालकाचा अंदाज चुकला. बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे. या अपघातात चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
