पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] सुमारे बाराशे डाॅक्टर सदस्य असलेली हडपसर मेडिकल असोसिएशन जगातील एकमेव संघटना असून ती डॉक्टरांसह समाजासाठी करत असलेले काम हे कौतुकास्पद आहे.तसेच संघटनेने उभ्या केलेल्या नोबल एचएमए भवनातून आता समाजाला नवी दिशा देण्याचे काम उभे राहवे, अशी अपेक्षा पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांनी व्यक्त केली.
हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने डीपी रस्त्यालगत उभारलेल्या “नोबल एचएमए भवना’ चे उद्घाटन पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन, दीप प्रज्वलन, कोनशिला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करून झाले,
यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार चेतन तुपे, नोबल हाॅस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ दिलीप माने, विलू पूनावाला फौंडेशनचे डॉ. नकुल शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन आबणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “सदस्यांच्या योगदानातून तीन हजार चौरस फूटाचे हे एचएमए भवन उभारण्यात आले आहे. संघटना सदस्यांच्या हिताबरोबरच सामाजिक आरोग्यासाठी देखील विविध उपक्रम राबवते तर या भवनातून या कामाला अधिक गती प्राप्त होईल.’
आमदार तुपे म्हणाले की, “हडपसर परिसरातील डॉक्टरांनी संघटनेच्या माध्यमातून चांगला आदर्श ठेवला आहे.भविष्यात या परिसरात सुमारे तीनशे एकरावर औषध निर्माण शास्त्राशी संबंधीत प्रकल्प सुरू होणार असून त्यादृष्टीने हडपसर मेडिकल असोसिएशनच्या. कामाची व्याप्ती वाढणार आहे.’
संघटनेचे सचिव डॉ. अजय माने, उपसचिव डॉ. वंदना आबणे, कोषाध्यक्ष डॉ स्वप्नील लडकत यांनी संयोजन केले
