पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बाजार समितीने तयार केलेल्या मतदार यादीवर अक्षय पिण्यास सुरुवात झाली असून काही इच्छुकान समितीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप केला जात आहे इच्छुकांना निवडणुकीत उभे राहण्यापासून रोखण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश शिर्के यांनी केला आहे
बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर याद्यात सादर करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीच्या प्रशासनाला दिले होते त्यानुसार बाजार समितीने सहकार निवडणूक प्राधिकरणाला नुकत्याच मतदार याद्या सादर केल्या आहेत बाजार समिती निवडणुकीसाठी दोन व्यापारी प्रतिनिधी साठी वर्ग आडते आणि खरेदीदार परवानाधारक मतदान करू शकतात मात्र बाजार समिती मतदार याद्या निवडणूक प्राधिकरणाला सादर करताना त्यात काही इच्छुक उमेदवारांनी मतदार यादी तयार करणाऱ्या बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हस्तक्षेप केल्याचा संशय व्यक्त केला आहे शिर्के म्हणाले की बाजार समितीमध्ये भाजीपाला विभागात माझा स्वतःचा वडिलोपार्जित गाळा आहे त्या गाळ्याचा नंबर 582 असून वडिलांच्या काळात बडदे आणि तापकीर यांच्याशी वडिलांनी व्यवसायात भागीदारी केली होत ही भागीदारी अनुक्रमे सन 2004 आणि 2010 अशी संपुष्टात आली आहे त्याबाबत भागीदारी विसर्जन पत्र बाजार समितीला जमा केले होते त्यानंतर बाजार समितीने मला सन 2015 ते 2019 या कालावधीपर्यंत आडत्या अ वर्ग परवाना दिला त्यानुसार मी आज पहावेतो केलेल्या व्यवसायापोटी बाजार समितीला सेस जमा करत आलेलो आहे बाजार समितीकडे भागीदारी भागीदारी तोडपत्र आधी सर्व कागदपत्रे जमा केली आहेत परंतु भागीदारीचे कारण देत समितीने वारस नोंद न करता मला अलीकडच्या काळात परवाना देणे बंद केले आहे
