पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] मतदार यादीतील नावे नोंदण्याची मुदत संपली असून येत्या गुरुवारी पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता या अंतर्गत जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती या यादीवर प्राप्त हरकती व सूचना निकाली काढण्यात आल्या आहेत या कालावधीत विशेष मतदार नोंदणीसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींची नव मतदार म्हणून मोठ्या प्रमाणात नोंद करण्यात आली आहे तसेच समाजातील वंचित घटकांमध्ये तृतीयपंथी शरीर विक्रय करणाऱ्या महिला यासह औद्योगिक वसाहती मधील कामगार यांचाही मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे या सर्व मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत अशी ही मतदार यादी येत्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे
