पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे ग्रामीण पोलिसांनी वाळूमाफियांवर मोठी कारवाई करत ४७ लाखाचा मुदूदेमाल जप्त करत केल्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी चांदगुडेवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीत कऱ्हा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणा-या वाळू माफियांवर कारवाई करुन पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तब्बल ४७ लाख ७० हजार रुपयांची जेसीबी, ट्रॅक्टर व वाळू जप्त केली.याप्रकरणी मनोहर शामराव चांदगुडे (रा. धरणवस्ती, चांदगुडेवाडी, ता. बारामती), स्वप्निल ज्ञानेश्वर भोंडवे व विठ्ठल तानाजी जाधव (रा. आंबी खुर्द, ता. बारामती), अमोल शंकर सणस (रा. ऊरुळीकांचन, ता. हवेली) व महादेव बाळू ढोले (रा. मोरगाव, ता. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यात कऱ्हानदी पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूचा उपसा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली,यावर पोलिसांनी क-हानदी पात्रात जाऊन तेथे दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर, ट्राॅल्यांमध्ये चाळण वाळू उत्खनन करून भरून चोरून नेली जात असल्याची परिस्थिती दिसली. पोलिसांची चाहूल लागताच जेसीबी चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तेथे सापडलेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या कारवाईत १० लाख व ८ लाख रुपयांचे दोन जेसीबी, ४ ट्रॅक्टर, ट्राॅल्या, ट्रक असा असा ४७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि राहूल गावडे, सहाय्यक फौजदार कारंडे, रविराज कोकरे, सचिन घाडगे, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, वडगावचे उपनिरीक्षक योगेश शेलार, पोपट नाळे, नवले, मारुती जैनक यांनी केली पुढील तपास पोलिस करत आहे.
