थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह)पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नायगावच्या माजी उपसरपंच पल्लवी गायकवाड यांनी वंचित बहुजन पक्षाच्या माध्यमातून गावामध्ये मोफत रेशनिग कार्डचे वाटप केले त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी प्रशंसा करत आहेअतिशय कौतुकास्पद असा उपक्रम त्यांनी राबवला असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोचली पाहिजे व गावातील गौरगरीब लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी गायकवाड कुटुंब सदैव जोमाने काम करत आहे गावातील गोरगरीब कुटुंबाना मोफत रेशन कार्ड काढून दिली आहेत पहिल्या टप्प्यात गावातील अकरा कुटुंबाना मोफत घरपोच रेशनिग कार्ड काढून दिली आहेत गावात राहणाऱ्या ज्या कुटुंबाला रेशनिग कार्ड नाही अशा लोकांची यादी तयार करुन त्याच्या सर्व कागदपञे एकञ करुन त्यांना कार्ड काढून दिल्यामुळे कार्डधारकांचा आंनद गगनात मावेनसा झाला प्रत्येकाच्या घरी जाऊन आज त्यांना कार्ड दिले यावेळी नायगांवच्या माजी उपसरपंच विघमान ग्रामपंचायत सदस्या पल्लवी नवनाथ गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव नवनाथ शंकर गायकवाड, तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *