बारामती [हवेलीनामा वृत्तसमुह] गावच्या सर्वांगीण विकासात साठी व लोकहिताची कामे मार्गी लागणारे यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाते मात्र या ग्रामसभेत बेकायदा धंद्याची विषय समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे बारामती तालुक्यातील गुणवडी येथे चक्क बेकायदा व्यवसायाचे समर्थन करण्याची भूमिका गावातील तरुणांनी घेतल्याचे समोर आले आहे.

प्रजासत्ताक दिनी जवळपास सर्वच गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येते अशीच ग्रामसभा बारामती तालुक्यातील गुणवडी गावात पार पडली यामध्ये आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात झालेल्या विकास कामांचा समाचार ग्रामस्थांनी घेतला परंतु यावेळी एका आगळ्यावेगळ्या अशा विषयावर चर्चा झाली ती बेकायदा दारू व्यवसाय बाबत गावातील दोन गटांनी मांडलेल्या परस्परविरोधी मतांनी. प्रत्येक गावातील ग्रामसभेत ग्रामस्थ हे गावातील बेकायदा दारू व्यवसायाचा प्रचंड विरोध करतात परंतु येथील ग्रामपंचायत मध्ये गावातील तरुणांच्या एका गटाने गावातील दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी केली तर दुसऱ्या गटांनी गावातील दारू धंदे बंद झाले तर गावातील दारुडे हे गावापासून जवळच असलेल्या बारामती शहरात जाऊन दारू प्यायला जातील त्यामुळे दारू धंदे बंद करू नाहीत तसेच दारू धंदे करणाऱ्यावर उपासमारी ची ही वेळ येईल असा विचित्र मत प्रवाह या दुसऱ्या गटांनी मांडला ज्या घरातील लोक दारू पितात त्या लोकांनी ग्रामसभेत दारू धंद्यास विरोध करण्यापेक्षा त्यांच्या घरातील दारुड्यांना दारू पिऊ नये असा सल्ला द्यावा अशी अजब मत त्यांनी मांडले. गुणवडी गावात ग्रामपंचायत तर्फे 2011 यावर्षी दारूबंदीचा ठराव घेऊन बाटली आडवी करण्यात आली होती परंतु असे करताना गावातील बेकायदा दारूधंदे बंद झाले नाहीत गावातील दारू धंद्यावर पोलिसांकडून वारंवार छापे टाकून कारवाई होताना दिसते परंतु पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई झाली तरी काही तासातच पुन्हा हे धंदेवाईक अवैध दारू विक्री पुन्हा चालू करतात.

दारूबंदी कायद्यात अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे कारण एखाद्या दारू व्यवसायिकावर कार्यवाही केली तर त्याला लगेच जामीन होतो आणि गावात दारू पिऊन भटकणाऱ्या ज्या घरात कायमच तणावाचे वातावरण असते घरातील सर्व तो कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होते याकरिता शासनाने यावर कठीण नियम घालून देण्याची गरज आहे एखादा दारुड्याला वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर तो छोट्या मोठ्या चोऱ्या करू नये आपले व्यसन भागवण्याचा प्रयत्न करतो गुणवडी गावातील अशा प्रकारे एका गटांनी दारू धंद्याचे समर्थन केल्याने उपस्थित नागरिक मात्र अवाकच झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *