हवेलीनामा (बापू धुमाळ) बारामती तालुका पोलीसांनी केली गांजा तस्करावर कारवाई या कारवाईत तब्बल पन्नास किलो गांजा केला हस्तगत.गाडीसह पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना घेतले ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर – बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार आहे अशी माहिती बातमीदारामार्फत मिळाली असता बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी रुई पाटी जवळ रुई गाव येथे रोडवर नाकाबंदी केली सायंकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्र.MH12JS0090 ही रुई गावातून रुई पाटीकडे येत असताना पोलिसांनी तिला थांबून चेक केले असता तिच्या डीकी मध्ये जवळपास 10 लाख रुपये किमतीचा सुमारे 50 किलो गांजा मिळून आला गांजा विक्रीसाठी घेऊन जाणारे सचिन दिलीप रणवरे (वय 35 वर्षे रा हिवरकर मळा सासवड ता पुरंदर जि पुणे)2) सुनिता प्रताप चव्हाण( वय 35 वर्षे रा सणसवाडी ता शिरुर जि पुणे मुळ रा माहुरगड ता पुसद जि नांदेड) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 लाख किमतीचा गांजा तसेच 5 लाख रुपये किमतीचा स्विफ्ट कार असा एकूण 15 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक बारामती, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, राहुल घुगे सहाय्यक फौजदार साळवे, पो. हवा. राम कानगुडे, सुरेश दडस,अतुल पाटसकर , राजेंद्र जाधव महिला पोलीस हवालदार खंडागळे, आशा शिरतोडे. पोलीस नाईक अमोल नरुटे बापू बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे , दीपक दराडे ,दत्ता मदने शशिकांत दळवी यांनी केली आहे.
पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हे करीत आहेत.
