पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] (पुजारी सर)

रस्ता चुकल्याच्या कारणावरून कंटेनर चालक आणि त्याचा सहकारी यांच्यात वाद झाला त्यामध्ये डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. वढू बुद्रुक गावाच्या हद्दीतील तुळापूर ते लोणीकंद रस्त्यावर 26 जानेवारी रोजी ही घटना घडली. शहजाद अब्दुल कयूम अहमद (वय 26, रा. पोखर भिटवा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा सहकारी समसुल अली अहमद खान (उत्तरप्रदेश) त्याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या मालकीच्या कंटेनरवर दोघे जण चालक होते. 26 जानेवारी रोजी वडू बुद्रुक गावाच्या हद्दीत कंटेनरचा रस्ता चुकल्याच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने शहजाद याच्या डोक्यात मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने शहजाद याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कंटेनरच्या केबिनमध्ये ठेवून आरोपी पळून गेला होता.

शहजाद अब्दुल कयुम अहमद याच्यासोबत तामिळनाडु येथुन चाकण, पुणे येथे कंटेनर मधील माल पोहचविण्यासाठी आला परंतु घटना घडल्यानंतर शमशुल खान पसार झाला होता. यावरुन संशयित शमशुल खान याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांचे पथक रवाना झाले त्याचा तांत्रिक विश्लेषणद्वारे आधार घेवुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने सांगितेल्या हकीकत व तांत्रिक विश्लेषणाचे केलेल्या तपासात विसंगती आढळुन आले, त्यास विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्याने वरील गुन्हा हा शहजाद सोबत रस्ता चुकल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातुन त्याचा खुन केल्याची कबुली दिली.

. ही कामगिरी गजानन पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सुहास पाटील, गजानन जाधव, पोलीस अंमलदार कैलास उगले, सारंग दळे, अमित देशमुख, बाळासाहेब सकाटे, कैलास साळुंके, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे, समीर पिलाणे, पांडुरंग माने यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *