पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्य माहिती आयुक्त यांनी माहिती अधिकारातील कागदपत्रे विना मोबदला देण्याचे आदेश देऊन देखील त्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितल्याने तडजोड करून 942 रुपये लाच स्वीकारताना मुळशी तालुक्यातील उरवडे गावच्या तलाठी संजय दाते यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,मुळशी तालुक्यातील उरवडे गावचे तलाठी संजय बाबुराव दाते यांनी तक्रारदाराकडून राज्य माहिती अधिकार आयुक्तांनी माहितीची कागदपत्रे मोफत देण्याचे आदेश देऊनही त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली, यावर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क करून तक्रार केली यावर तलाठी संजय दाते व कोतवाल अमित भंडलकर यांना याप्रकरणी दोषी पकडून संजय दाते यांनी तडजोडी अंती 942 रुपये स्वीकारत असताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे ही कारवाई लाचलुचपात प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, पुढील तपास पोलीस उपाधीक्षक क्रांती पवार करीत आहेत.
