पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] महापुरूषांची बदनामीकारक पोष्ट फेसबुकवर प्रसिद्ध झाल्यामुळे हडपसर भागात दंगल झाली यात अभियंता मोहसिन शेख याचा खुन झाला होता याप्रकरणात हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई यांच्यावर कारवाई करण्यात आली या रकरणाची सुनावणी आज पार पडली यामधील सर्व 21 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. देसाईच्या वतीने अॅड. मिलिंद पवार, अॅड. सुधीर शहा व अॅड. अमोल काळे यांनी युक्तिवाद केला.
हडपसर परिसरात 2 जुन 2014 रोजी दंगल झाली होती. त्यामध्ये संगणक अभियंता मोहसिन शेख (वय 26, रा. हडपसर, मूळ. सोलापूर) याचा मृत्यू झाला होता. यावर मोहसिन याचा भाऊ मोबीन मोहम्मद सादीक शेख (वय 28) याने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय 34, रा. हिंदुगड, मुळशी) व 20 जणांना अटक करण्यात आली व त्याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
