पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावे यासाठी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या असतात त्या अनुषंगाने समाजाला अहितकारक असणाऱ्या गोष्टी यावर निर्बंध घातलेले आहेत यात जुगार, मटका,गुटखा अशा अनिष्ट गोष्टी यांना प्रतिबंध करण्यात आलेला असतो परंतु सध्या दूरचित्रवाणी वरील काही वाहिन्यांवर ऑनलाइन रम्मीची जाहिरात केली जाते यावर संबंधित विभागाचे लक्ष कसे जात नाही हा प्रश्न उपस्थित होतो जाहिरातीचे नेमके काय धोरण असते हे सर्वसामान्यांना समजण्या पलीकडे असल्याने यावर माहिती व प्रसारण विभागाने याची खातरजमा करून यावर प्रतिबंध घालावेत असा सुर प्रेक्षकांकडून येत आहे तर याकडे राजकीय पक्षानेही लक्ष घातले असून राष्ट्रवादीकडून या जाहिरातीवर बंदी घालण्याची मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

ऑनलाइन रम्मीचे आमीष दाखवताना कुटुंबातील सदस्यांचे चित्रीकरण करून मिळालेल्या पैशातून कसा आपला सहकारी आनंदी होतो हे दर्शविले जाते यातून रम्मी खेळासाठी उद्युक्त करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचेच प्रथमदर्शनी दिसून येत आहे जुगार मटका ही सर्व कुटुंब व्यवस्थेसाठी अनिष्ठ प्रकार असल्याचे आपणास माहिती आहे त्यावर शासनाने प्रतिबंध लावलेला आहे मग रमी या खेळाची जाहिरात कशी केली जाते हा प्रश्न अनुत्तरित आहे आहे यावर त्वरित कारवाई करून अशा कोणत्याही समाजविघातक खेळाची जाहिरात सार्वजनिक कार्यक्रमात केली जाऊ नये याची जबाबदारी शासनाची आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *