थेऊर (हवेलीनामा वृत्तसमह) सोरतापवाडी(ता.हवेली) गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुनिल सुखराज चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी सुनिल नामदेव ढगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अशोकराज चौधरी आणि उपाध्यक्ष प्रवीण चोरघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर सरपंच संध्या चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी सुनिल चौधरी यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी सुनिल ढगे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघाचे राज्यप्रमुख सोनबा चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास चौधरी, हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तानाजी चौधरी, उपसरपंच शंकर कड, माजी उपसरपंच निलेश खटाटे, अमित चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी, अजिंक्य चौधरी, राजू चौधरी, नामदेव चौधरी, नवनाथ चौधरी, सोमनाथ चौधरी, माधुरी चौधरी, शीतल चौधरी, रेखा चौधरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
