पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे केवळ पाचशे रुपयांवरून एका पर्यटक व्यावसायिकाचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली,यात विनायक ऊर्फ संतोष बबन गोडसे (वय ४२, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), व्यक्तीचा खुन झाला आहे.याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यामध्ये सचिन भीमाजी जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचा व गोडसे यांचा पर्यटनाचा व्यवसाय असून ते दोघे मित्र आहेत, त्यांचाही त्यांच्या जवळ असलेली क्रुझर जीप (क्र. एम.एच.१४ डी.टी.५३०८) आळेफाटा येथे असलेल्या हैदराबादी यांच्या गॅरेजवर दुरुस्तीसाठी लावली होती व देखभाल दुरुस्तीसाठी ७६०० रुपये देण्याचे ठरवले होते. त्यानुसार मयूर अशोक सूर्यवंशी (रा. राजुरी, या. जुन्नर) या फिटरने काम केले. त्यानंतर विनायक याने मयूर यास ७१०० रुपये दिले, ५०० रुपये देणे बाकी होते. ते मागण्यासाठी मयूर हा विनायक याला फोन करत होता. तसेच, ‘माझे पैसे का देत नाही,’ अशी फोनवरून शिवीगाळ करत होता. मंगळवारी रात्री विनायक हा हैदरभाईच्या गॅरेजमध्ये गेला. तेथे त्याने मयूर याला, तू मला शिव्या का देतोस?’ अशी विचारणा केली. त्यावेळी मयूर याने विनायक याच्या छातीत व बगलेजवळ चाकू खुपसला. त्याला प्राथमिक उपचारासाठी माउली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यास पुढील उपचारासाठी पुणे येथे जाण्यास सांगितले. परंतु चाळकवाडी येथे त्याचा मृत्यू झाला.

मयूर याने विनायक याच्यावर हल्ला केल्यानंतर त्याच चाकूने स्वतःवर वार करून घेतला. त्याच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात उपचार चालू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *