मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले असून ‘ पवारांबाबत माझं आधीपासूनचं मत कायम आहे. शरद पवार हे भाजपबरोबर आहेत. तुम्हाला लवकर याची प्रचिती येईल, तुम्ही डोळेझाक करून चाललेला आहात माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही’, असं प्रकाश आंबेडकरांनी परखड मत मांडले.उध्दव ठाकरे आणि वंचित यांची कालच युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे, महाविकासआघाडीसोबत नाही. आपल्याला महाविकासआघाडीसोबत युती करण्याची इच्छा नाही, असं स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल.

एवढच नाही तर शिवसेना-वंचितची युती झाली तर सरकार येईल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर महाविकासआघाडीचा भाग असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर आता शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *