थेऊर [हवेलीनामा वृत्तसमुह] देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आज थेऊर परिसरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा ग्रामपंचायत कार्यालयावर पडला गावच्या प्रथम नागरिक सरपंच शितल काकडे यांनी ध्वजपुजन करून ध्वजारोहण केले.

संपूर्ण देशात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त स्रिशक्तीचा जागर ही संकल्पना राबवली जात आहे राजपथावरील पथसंचलनात देखील महिला अधिकारी नेतृत्व करत आहेत, थेऊर परिसरात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वजारोहणास तलाठी सविता काळे,पोलिस हवालदार विजय जाधव,विशाल बनकर, ग्रामसेवक तुकाराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य काळूराम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे,राहूल कांबळे,रूपाली रसाळ,गौतमी कांबळे,चंद्रभागा शिर्के,शशिकला कुंजीर,मंगल धारवाड,सिमा सुखराज कुंजीर,जेष्ठ नागरिक विजय आविनाशे, हवेली आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रंजीत काळे,माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेश चव्हाण,रामकृष्ण हरीचे संचालक दिलिप लगड,स्वाती बधे,प्रकाश आळंदे रामदास तारु,एकनाथ जगताप,भगवान धारवाड चिंतामणी विद्यामंदीरचे संगीत विभाग प्रमुख जीवन शिंदे व विद्यार्थी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमात गावातील मान्यवर उपस्थित होते मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यात विद्यार्थ्यांकडून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले.सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते इयत्ता पहिलीत शिक्षण घेणाऱ्या गार्गी लोंढे या विद्यार्थ्यीनीने, तिने आपल्या छोट्याशा पण अतिशय सुंदर शब्दात मांडणी करत भाषण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *