[हवेलीनामा वृत्तसमुह]

दररोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी वर्षाला ४० लाख रुपये पगार मिळत असल्याचं प्रामाणिक व कर्तृत्ववान वक्तव्य अधिकाऱ्याकडून करण्यात आल आहे.जेष्ठ प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र लिहून आपली भावना कळवली आहे. तर आपणास हरियाणाच्या राज्य दक्षता विभागाचा प्रमुख म्हणून नियुक्ती मिळावी, अशी मागणी देखील केली आहे.

अशोक खेमका यांनी २३ जानेवारीला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र लिहिले. खेमकांच्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. खेमका यांची ९ जानेवारी २०२३ पासून हरियाणाच्या अभिलेख विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, या ठिकाणी करण्यासारखं फार काही कामच नसल्याचं खेमका यांनी म्हटलंय.

खेमका पत्रात लिहिले की, “अभिलेख विभागात मला एका दिवसात जेमतेम ८ मिनिटे काम आहे. त्यासाठी मला वर्षाला ४० लाख रुपये पगार मिळतो आहे. पी. के. चिन्नास्वामी विरुद्ध तामिळनाडू आणि इतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १९८७ ला दिलेल्या निकालात प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या पदानुसार नियुक्ती आणि काम दिले पाहिजे, असं मत नोंदवलं आहे.”

दि.९ जानेवारी २०२३ रोजीच्या आदेशानुसार माझ्याकडे अभिलेख विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या विभागाचे वार्षिक बजेट ४ कोटी रुपये आहे. ही रक्कम राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ०.००२५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात मला येथे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून वर्षाला ४० लाख रुपये वेतन दिले जाते. हे प्रमाण विभागाच्या एकूण बजेटच्या १० टक्के आहे,” असं मत अशोक खेमका यांनी व्यक्त केलं.

“अभिलेख विभागात मला आठवड्यातून केवळ एक तासाचं काम आहे. दुसरीकडे इतर विभागांमध्ये काही अधिकार्‍यांवर अधिकच्या कामाचा भार आहे. अशा एकतर्फी कामाच्या वितरणाने सार्वजनिक हित साधलं जाणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याची सचोटी, योग्यता आणि बुद्धीमत्ता लक्षात घेऊन काम दिलं पाहिजे,” अशी मागणी खेमकांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *