पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कायद्याचा धाक कायम राहण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे अत्यावश्यक आहे. माझी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण या घटनांची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी. शहरातील या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश द्यावेत.अस खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन विनंती केली आहे.

शहरात गेली काही दिवसांपासून गुन्हेगारांनी थैमान घातले असून कोयता गॅंग आणि त्यानंतर आता राजरोसपणे गोळीबाराची घटना उजेडात आली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगने मोठा हैदास घातला आहे. अनेक भागात रात्रीच्या वेळी कोयता गॅंग नागरिकांना धमकावून लुटत असल्याच्या घटना घडत आहेत

सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, पुणे शहरात गेली काही दिवसांपासून गुन्हेगारांनी थैमान घातलं आहे. कोयता गॅंग आणि त्यानंतर आता राजरोसपणे गोळीबार केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *