थेऊर (हवेलीनामा वृत्तसमुह) अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर(ता.हवेली)येथे आज माघ महिन्यातील विनायकी चतुर्थी असल्याने याचे गणेश भक्तामध्ये विशेष महत्त्व आहे ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते यानिमित्ताने अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात विविध रंगीबेरंगी विद्युत रोषणाई फुल तसेच फुग्याची आरास केली होती मंदीर परिसरात रंगेबिरंगी रांगोळी काढली होती सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली चिंतामणी देवाचे पुजारी मकरंद आगलावे यांनी पहाटे पाच वाजता महापुजा केली त्यानंतर महान गणेशभक्त मोरया गोसावी यांचे वंशज पिरंगुटकर देव तसेच हिंजवडीकर देव यांचेवतीने अरुण देव व प्रकाश देव,नारायण देव, यांनी महाअभिषेक केला. चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली.श्रीच्या मूर्तीला भरजरी पोषाख व दागिने घालण्यात आले आज सर्वत्र गणेश जयंतीची धामधूम सुरु असते.गावातील चिंतामणी भजनी मंडळ आणि परिसरातील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला आगलावे बंधू तसेच चिंचवड देवस्थान यांचेवतीने संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती त्यामुळे संध्याकाळी हा परिसर नेत्रदीपक दिसत होता.दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.या सर्व व्यवस्थेवर चिंचवड देवस्थानचे व्यवस्थापक मंगलमूर्ती पोफळे लक्ष ठेऊन होते.रात्री श्रींचा छबिना काढण्यात आला व रात्री पिरंगुटकर देव व हिंजवडीकर देव यांनी रात्रभर पंचपदी केली जाईल यात महासाधू मोरया गोसावी चिंतामणी महाराज नारायण महाराज रचित पदांचा धूपआरती पहाटे पर्यंत चालेल.

येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख मार्गदर्शनाखाली विशाल बनकर, विजय जाधव तसेच वाहतूक शाखेचे उमेश ढाकणे, वार्डन सागर राऊत यांनी वाहतूक सुरळीत करण्यास दिवसभर मदत केली त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही नेहमी या ठिकाणी भाविक आस्थाव्यक्त वाहने लावून जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होत असे परंतु दिवसभर उमेश ढाकणे यांनी  सर्व नियंत्रित केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *