पुणे  [हवेलीनामा वृत्तसमूह] पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीतील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा लोणी काळभोर पोलीसांच्या डाव उधळून लावत चार दरोडेखोरांना आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे ब्रिजचे जवळून रात्री दोन सव्वादोन वाजण्याच्या सुमारास अटक केली.

प्रजासत्ताक दिनाचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांचे सहकारी हॉटेल, लॉज चेक करणे, तसेच पाहीजे व फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गस्त घालत होते.तेंव्हाच बीट मार्शल धनश्याम आडके व ईश्वर भगत यांना कॉल प्राप्त झाला की, “७ ते ८ इसम हे म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजचे जवळ हत्यारासह थांबले असून ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत” अशी माहिती मिळालेली माहिती पोलिसांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तातडीने एक पथक तयार करून घटनास्थळी पाठवले.तेथे पोलिसांना म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजच्या पलीकडे उजव्या बाजुच्या वळणावर पाच ते सहा इसम पळुन जात असल्याचे दिसून आले.दरम्यान त्याचा पाठलाग करत ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांची नावे प्रेम राजु लोंढे (वय १९ रा. रेल्वे गेटजवळ आळंदी रोड (ता. हवेली जि पुणे मुळ रा. जामखेड, गोरोबा थीएटर जवळ, अहमदनगर), ऋषिकेश उत्तम लोंढे (वय २६, रा. पानमळा रोड ता हवेली जि. पुणे मुळ रा. बावळगाव जि. बिड), गणेश भगवान खलसे वय २२ वर्षे रा. माळवाडी कुंजीरवाडी ता हवेली जि पुणे) व तानाजी भाऊसाहेब गावडे (वय २३ रा. माळवाडी -कुंजीरवाडी ता हवेली जि पुणे) अशी असल्याने सांगून आपण पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले त्यांच्याकडून २ लोखंडी पालयन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी अशा वस्तु जप्त करण्यात आल्या.

ही कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, पोलीस नाईक सुनिल नागलीत, श्रीनाथ जाधव, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, बाजीराव वीर, विश्रांती फणसे, धनश्याम आडके व ईश्वर भगत यांच्या पथकाने केली आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *