पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] गरीब क्षय रुग्णांना दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्यासाठी निक्षय मित्र योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरू केली आहे भारताला सन 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याच्या ध्येयाचा तो एक भाग आहे त्यानुसार इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर शाखेनं पन्नास रुणांना दत्तक घेतले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समूह, व्यक्ती, सामाजिक संस्था आपआपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षय रुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्त घेऊ शकतात पोषण आहार उपलब्ध नसलेल्या व्यक्तींमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक असतं अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असं नाही त्यामुळे क्षय रुग्णांसाठी पोषक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे रुणांसाठी पोषण आहार संच तयार करण्यात आले आहेत पोषण आहार घेण्याची अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती संस्था यांनी पुढाकार घेऊन पोषण आहारासाठी मदत करावी असा आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर शाखेनं दत्तक घेतलेल्या 50 पैकी पंधरा रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पोषण आहार संचाचे वाटप करण्यात आलं रेड क्रॉस च्या पुढाकाराचे कौतुक करत समाजातील इतर दानशूर लोकांनीही अशा पद्धतीने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असा आवाहन रेखावार यांनी केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *