नाशिक   (हवेलीनामा वृत्तसमूह)  नाशिक जिल्ह्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत एका फार्मास्युटिकल साई टेक कंपनीला भीषण आग लागली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आगल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे आगीत कंपनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी मधील साई टेक फार्मा कंपनीस भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही साई टेक फार्मा यांच्या दोन कंपनी असून आग लागलेल्या ठिकाणी गोळ्या औषधांची साठवणूक करण्यात येत होती.नियमित काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे कंपनीला आग लागली. दरम्यान आग लागल्यानंतर औषधांचा साठा ठेवलेल्या पुठ्याच्या बॉक्सलाही आग लागल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले कंपनीत काम करणाऱ्या कामगार बाहेर पडले कंपनी प्रशासनाने सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला माहिती असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांच्या दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणता आली. एमआयडीसी व सिन्नर अग्निशमन दलाच्या कर्मचारी व स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरी या आगीत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *