यवतमाळ [हवेलीनामा वृत्तसमूह ] यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे पेपर सोडवताना एका विद्यार्थीचा मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे शाळेत गणिताचा पेपर सोडविताना दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारीच्या सुमारास बाभूळगावात घडली.प्रतीक गजानन थोटे (१६, रा. सरूळ) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बेशुद्ध होऊन तो अचानक खाली कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
बाभूळगाव येथील प्रताप विद्यालयाचा तो विद्यार्थी होता. या विद्यालयात दहावीच्या वर्गाची सराव परीक्षा घेतली जात आहे. सोमवारी गणित विषयाचा पेपर होता. पेपर सोडवत असताना प्रतीक अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्यामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी त्याला बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे सरुळ गावासह परिसरात शोककळा पसरली असून घडलेल्या घटनेमुळे सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे
प्रतीक शाळेत अतिशय हुशार होता त्याला खेळाची विशेष आवड होती शाळेत तो खो-खो खेळाचा उत्कृष्ट खेळाडू होता.त्याच्या अचानक जाण्याने विद्यार्थी मिञपरिवारासह सर्वांनाच धक्का बसला आहे
