लोणी-काळभोर [हवेलीनामा वृत्तसमुह] पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशननजीकच्या एमआयटी काॕर्नर हा नेहमीच अपघाताचे ठिकाण आजही बेजबाबदारपणाच दुचाकीस्वार समोरासमोर धडकले आणि दोघेही जखमी झाले.हा अपघात घडला कसा तो शेजारील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत असून रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या दुसर्‍या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोन्ही दुचाकीवरील युवक उडून रस्त्यावर पडले,दरम्यान पाठीमागून येणाऱ्या बसच्या चालकाने बसचा ब्रेक दाबला नाहीतर मोठा अपघात घडला असता. या अपघतात एक जण गंभीर जखमी आहे तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे जखमीस तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

 

लोणी-काळभोर स्टेशन परिसरातील युवक कायमच अपघात घडल्यानंतर लगेच मदतीला धावून येतात याचा परिणाम जखमीस वेळेवर उपचार मिळतात तर हाकेच्या अंतरावर असलेले सुसज्ज हाॅस्पिटल त्यामुळेच गंभीर दुखापत झाली तरीही वेळेवर उपचार उपलब्ध होतात.

वाहनचालक विशेषतः दुचाकीस्वार वाहने बेदरकारपणे चालवतात यामुळे स्वतःचा जीव तर धोक्यात घालतात परंतु दुसर्‍यास देखील जोखमीत टाकतात पालकांनी याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे आवश्यक आहे घटना घडल्यानंतर पश्चाताप करुन उपयोग होत नाही.यासाठी घरातूनच शिस्तीचे धडे गिरवणे गरजेचे होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *