थेऊर (हवेलीनामा वृत्तसमुह) वातावरणात होत असलेल्या चढउताराचा परिणाम आरोग्यावर होत असून दवाखान्यात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
साधारणता दिवाळीनंतर थंडीच्या मोसमास सुरुवात होते आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा मोसम अतिशय चांगला असल्याने अनेक जण शारीरिक कष्टाचे व्यायाम करताना दिसतात परंतु जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उत्तरेकडून येणारी थंड हवा यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यातील तापमान घसरले याचा परिणाम सर्वत्र हुडहुडी भरली वातावरणात असणारी थंड हवा त्यामुळे सर्दी, ताप, खोकला अशा आजाराने तोंड वर काढले आहे तसेच व्हायरल इन्फेक्शन वाढल्याने अनेक जण आजारी असल्याचे दिसून येते यामुळे परिसरातील खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
कोरोना नंतर सर्दी, खोकला, ताप अशी व्हायरल लक्षणे अलीकडे वाढल्याचे दिसून येते आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे परिधान करणे, ताजे व सकस अन्न खाणे, फळांचा दररोज आहारात उपयोग करणे आवश्यक आहे असे डाॅक्टरांनी सांगितले.
