पंढरपूर (हवेलीनामा आॕनलाईन)  पंढरपूर शहरात महिलांसाठी बांधण्यात आलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये आज सोमवारी  9 वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली,यामुळे परिसरात सर्वत्र भितीचे वातावरण आहे बालकाच्या मृतदेहाची चिरफाड झाल्याने हा खून आहे की दुसरे काही याचा शोध आता पोलीस घेत असून संतपीठ भागातील जगदंबा वसाहतीमध्ये राहणाऱ्या तिमा पांडूरंग धोत्रे यांचा नऊ वर्षाचा मुलगा कृष्णा तिमा धोत्रे हा रविवारी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या घरातून जेवण करून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरु होता रात्री तिमा धोत्रे हे संतपेठ पंढरपूर येथील घराशेजारी बंद असलेल्या सार्वजनिक महिला शौचालयाजवळून सोमवारी पहाटे जात असताना त्यांना हा मृतदेह आढळून आला. घडलेल्या घटनेची महिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले

पहाटे अंधारात त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून पाहिल्यानंतर तो मृतदेह कृष्णाचा असल्याचे समजले. त्याचा शरीरातील गळ्यापासून   बेंबीपर्यंतचा भाग  गायब होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सी. व्ही केंद्रे, कपिल सोनकांबळे, आकाश भिंगारदेवे, सूरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, दादा माने, सचिन इंगळे, बिपीन ढेरे, शरद कदम, राकेश लोहार, शहाजी मंडले, सुनील बनसोडे हे घटनास्थळी पोहोचले. परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांचा मोठा सुळसुळाट असल्याने अशा प्राण्यांनी त्याला जखमी करून त्याच्या शरीराचा भाग खाल्ला असल्याने कृष्णाचा मृत्यू झाला का? अशी शंका आता पुढे येऊ लागली आहे. तर कृष्णावर डुकराचा हल्ला नसून त्याचा घातपात झाला असावा, अशी शंका नागरिक व्यक्त करू लागल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व प्रकारची सखोल चौकशीला सुरुवात केली असून परिसरात सीसीटीव्ही फुटेज सापडते का याचा तपस पोलीस करत आहेत. या प्रकरणाने परिसरात खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पालकांना आपल्या मुलांची काळजी वाढली  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *