वाघोली (हवेलीनामा आॕनलाईन) वाघोलीतील आय व्ही इस्टेट कडून नगर रस्त्याला जोडणारा सुसज्ज रस्ता मिळावा यासाठी मागील नऊ वर्षापासून लढा सुरू असून रस्ता मिळत नसल्याने येथील रहिवाशांनी वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशनच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे वाघोलीच्या समस्यांबाबत प्रशासनाचे अनेक वेळा दरवाजे तोटा होऊन देखील याची दखल घेतली जात नाही या भागात जवळपास 30 हजार नागरिक वास्तव्यास आहेत सन 2014 पासून रस्त्याच्या प्रश्न प्रलंबित असून हा रस्ता सध्या अतिशय धोकादायक स्थितीत आहे या रस्त्याचा मूळ मालक व बिल्डर यांच्यात वाद असल्याने हा रस्ता होऊ शकत नाही डीपी रस्ता करण्यासाठी पीएमआरडीए जमीन संपादित करून मार्ग काढू शकते परंतु प्रशासन कोणताच प्रयत्न करीत नसल्याचे व हा रस्ता सध्या अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येते लोकप्रतिनिधीही देखील याबाबत निष्क्रिय असल्याचे या सोसायटी धारकांचे म्हणणे आहे आपल्याला न्याय मिळत नसल्याने अखेर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठेवणे शिवाय पर्याय नसल्याचे असोसिएशनचे नरेंद्र पाटील संतोष कृष्णा मनोज पुजारी नितीन कुमार जैन आशिष देशमुख अर्जित चटर्जी यांनी सांगितले
