पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास व संधी मिळाली आहे याचा फायदा तरुण पिढीने घ्यावा असा सल्ला माझी केंद्रीय कृषिमंत्री व अखिल भारतीय मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला
ते काल पुण्यात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च पर्वती सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि एस एन इ चेंबर ऑफ इंडिया यांच्या वतीने पर्वती येथील शाहू महाविद्यालयाच्या आवारातील विद्यालयाच्या संकुलात स्थापन करण्यात आलेल्या डीएसटी कार्यशाळेत रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते
शरद पवार पुढे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी तरुण विज्ञान तंत्रज्ञानात संशोधन करून विकास करतील यासाठी शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने त्यांच्या पायावर उभे राहण्यास व स्वावलंबी होण्यास मदत करणे गरजेचे आहे स्टार्ट अप व अन्य योजनांमुळे जवळपास 80 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे यासाठी तरुणांनी जगात कोठे नोकरी जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे तसेच संशोधन व तंत्रज्ञानामुळे देशाचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नाना नक्कीच यश मिळेल असे त्यांनी यावेळी नमूद केले

