पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) 14 वर्षापर्यंतच्या मुलांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यावे त्यांना अत्याधुनिक गॅजेट्स पासून दूर ठेवावे असे आवाहन जेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी केले आहे त्या राजस्थानातील जयपूर येथे सोळाव्या साहित्य महोत्सवात बोलत होत्या

सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या की कोरोना काळात मुलांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागले ती काळाची गरज होती परंतु आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांना शिक्षण देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम पुढे आले आहेत यामुळे डोळ्यावर ताण आला होता तसेच अभ्यासाकडे बारकाईने लक्ष देणे अशक्य झाले होते त्यामुळे वाचनाकडे मुलांची सवय कमी झाली आहे तरुण पिढीमध्ये ज्ञान घेण्याची लालसा कमी होत चालली असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली मुलांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे देणे टाळावे असे आवाहन करताना त्या म्हणाल्या की अशा उपकरणामुळे पुस्तके हाताळण्याची सवय मुलांची मोडली आहे त्याकरिता किमान 14 वर्षे वयापर्यंत मुलांना इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून दूर ठेवावे तरच मुलांचा ओढा वाचनाकडे वळेल यासाठी पालकांची मोठी जबाबदारी आहे असे त्यांनी नमूद केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *