•           पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत असून पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर धमकी देऊन गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत खेड पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही घटना खेड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण हादरून गेले होते. समीर थिगळे हे मनसेचे खेड तालुक्यातील तडफदार नेते म्हणून ओळखले जातात.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर थिगळे हे त्यांच्या घरी सात रकस्थळ इथे घराजवळ उभे असताना अज्ञात व्यक्ती तिथे आला व धमकावत ‘ तुला लई माज आलाय, एकाला तर संपवलाय, आज तुलाही संपवतो’, असे म्हणत थीगळे यांच्यावर आरोपीने पिस्तूल रोखत पैशाची मागणी करू लागला. मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्याने थिगळे हे थोडक्यात बचावले आहेत. दुसरी गोळी आरोपीने हवेत फायारींग केली. त्यानंतर गोळीबार करत आरोपी घटना स्थळावरून फरार झाले आहेत. कुटूंबियांच्या समोर ही घटना घडल्याने घरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *