कुंजीरवाडी (हवेलीनामा आॕनलाईन)

कुंजीरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य हरेश गोठे यांची पुतणी तथा विठ्ठल गोठे यांची कन्या ईश्वरी गोठे हिच्या नामकरण व प्रथम वाढदिवस एक आगळावेगळा उपक्रमाने साजरा झाला.हिंदू धर्मात सोळा संस्कारात नामकरण हा एक संस्कार आहे.यावेळी परिवारातील मित्रमंडळ आप्तेष्ट एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. आलेल्या पाहुण्यांना एक पवित्र तुळशीचे रोप व एक पुस्तक भेट देण्यात आले. एक तुळशीचे रोपटे व एक्य पुस्तक भेट देऊन एक अनोखा उपक्रम राबवल्यामुळे परिसरात चांगला संदेश दिला.

अलीकडच्या काळात वाचन संस्कृती लोक पावत असल्याचे दिसते मोबाईल फोन आणि टीव्हीवरील भरकटत जाणारी धाराविक यामुळेच घरातील वातावरण बिघडत आहे.यावर एकच उपाय म्हणजे चांगले साहित्य वाचन होय याचाच धागा पकडून कुंजीरवाडीतील ग्रामपंचायत सदस्य हरेश गोठे यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *