नवी दिल्ली (हवेलीनामा आॕनलाईन) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 23 जानेवारी हा जयंती दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करावा असं केंद्र सरकार ने जाहीर केल आहे याचं औचित्य साधून आयोजित केलेल्या एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य पद्धतीनं अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील 21 द्विपांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे प्रदान करणार आहेत सगळ्यात मोठ्या द्वीपला सगळ्यात पहिल्या परमवीर चक्र विजेत्याचं नाव देण्यात येणार असून याच क्रमाने पुढील नाव देण्यात येतील याच कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस द्विपावरील राष्ट्रीय स्मारकाचा लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होणार आहे या द्वीपसमूहातील निलायर्लंड आणि हॅवलॉक आयलँड यांना अनुक्रमे शहीदद्वीप आणि स्वराज ही नाव देण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *