कोल्हापूर (हवेलीनामा आॕनलाईन) कोल्हापूर जिल्ह्यातील काखे गावात घडली धक्कादायक घटनेनी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे भारतीय लष्करात जवान असलेल्या काखे (ता.पन्हाळा) मधील जवान सत्यजित महादेव खुडे (वय २८) याने गुरुवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद त्याचा भाऊ सुनील खुडे याने पोलिसांत दिली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  सत्यजित हा सात वर्षांपूर्वी लष्करी सेवेत दाखल झाला होता. त्याची जम्मू येथे नियुक्ती झाली होती. त्याची नुकतीच बदली वडोदरा, गुजरात झाली होती. वडोदरा येथे रुजू होऊन एक महिन्याच्या सुटीवर १ जानेवारीला रोजी काखेगावी आला होता. चार वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. त्याला दोन वर्षांचा एक मुलगा आहे.गुरुवारी दुपारी घरी तो माडीवर झोपण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास त्याचा भाऊ त्याला उठविण्यास गेला असता आत्महत्येची घटना लक्षात आली. सत्यजितला उपचारांसाठी तत्काळ कोडोली येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल केले; परंतु उपचारांपूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील व एक भाऊ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *