पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) (पुजारी सर) जीवनाच्या प्रत्येक अंगाला वळण देण्याचे काम आई जन्मापासून करत आलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे बहु आयामी व्यक्तिमत्व तयार होण्यात केवळ आईचा संस्कार कारणीभूत असतो याचीच प्रचिती कोल्हापूर येथील एका कार्यक्रमांमध्ये आली डाॅ.भाग्यश्री पाटील यांच्या मातोश्री शांता देवी पाटील यांच्या 84 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पाचही मुलांनी आपल्या यशा मागचे सर्व श्रेय आपल्या आईलाच देत त्यांनी घेतलेल्या कष्टांवर आणि केलेल्या संघर्षांवर तसेच संस्कार याची परिणती म्हणजे आम्ही पाचही भावंडांनी मिळवलेलं हे यश होय, आपल्या यशाचे श्रेय आईला देताना पाचही भावंडांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले अर्थातच सभागृहात जमलेल्या प्रत्येक प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळू लागले
आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील यांनी आपली आई शांतादेवी यांचा स्वभाव, संस्कार, कष्टाचा काळ आणि त्यांची दूरदृष्टी यावर भरभरून बोलत असताना या सर्वच भावंडांंना सभागृहात हुंदका दाटून आला. हा सर्व प्रसंग इतका हळवा झाला की उपस्थित विद्यार्थी व प्रेक्षक यांचेही डोळे भरून आले. या सर्व भावंडांनी आपल्या आई सौ.शांतादेवी पाटील यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल सयाजी येथील विशेष समारंभात सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप योजनेचा प्रारंभ झाला. आईने आम्हांला मोठ केले,.जीवनाचे धडे दिले आणि दूरदृष्टी दिल्यामुळेच जीवनाच्या विविध क्षेत्रांत आम्ही भावंडे यशस्वी झाल्याची कबुली पाचही जणांनी दिली.हे सर्व समोर असलेल्या आई आपल्या मुलांकडून होणार कौतुक फक्त शांतपणे ऐकत होत्या
भाग्यश्री पाटील यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या आयुष्याचे चित्रच उभा केलं. त्या म्हणाल्या,आज भारतात तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे तरुणांनी बील गेट,सुधा मूर्ती सारखे होण्याची तयारी ठेवावी तर सधन पालकांनी कर्तृत्ववान विद्यार्थ्याचे पालकत्व घ्यावे. आज जे डाॅ. डी वाय पाटील समुहाचे साम्राज्य पाहून सर्वांनाच त्याचे अप्रूप वाटते परंतु ही गोष्ट सहज घडत नाही. आम्ही देखील सर्सासर्वसामा घरातूनच आलो आहोत.केवळ तीस रुपयांवर आम्हा पाच भावंडांना लहानाच मोठ केल चुलीवरील भाकरी आम्हांस वाढवलं.विशेष म्हणजे आम्ही एका ताटात दहीभात खाल्ला आहे
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील म्हणाले की, आईची दूरदृष्टी आम्हांस वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी होण्यास कारणीभूत ठरली. वडील पुण्या-मुंंबईत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना आईने समर्थपणे त्यांना साथ दिली.आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेत शिक्षण देण्याचा आग्रह तिने धरला.त्याची किंमत आम्हाला आज कळते आहे.तर आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, आम्ही दोन भाऊ, तीन बहिणी यांना सक्षम करण्यातआईचा सिंहाचा वाटा आहे. बालपणी बेताचीच परिस्थिती असल्याने शिक्षण घेताना केएमटी आणि सायकलने प्रवास केला. मी सेंट झेवियर्समध्ये शिक्षण घेताना तिथे प्रवेश मिळावा यासाठी भाग्यश्री दहा-पंधरा दिवस शाळेच्या बाहेर थांबायची. आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्याने सहाजिकच आम्ही शेती करावी अशी नैसर्गिक प्रक्रिया असते परंतु आमच्या आईने आम्हाला चांगले शिक्षण दिले. मी आणि भैया त्याकाळी श्रीराम दूध डेअरीमध्ये दूध घालायलाही जात असू.
