पंढरपूर (हवेलीनामा ऑनलाईन) शाळेत परीक्षेचा पेपर लिहीत असताना नऊ वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनन्या भादुले ही नऊ वर्षाची मुलगी आपल्या शाळेत परीक्षेचा पेपर लिहीत असताना अचानक चक्कर येऊन पडली तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले परंतु तिला वाचविण्यात यश आले नाहीत अनन्याच्या परिवारांवर दुःखाचा डोंगर पसरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पेपर संपण्यास केवळ दहा मिनिटे शिल्लक राहिली होती त्यावेळी ती चक्कर येऊन खाली पडली अशी माहिती पुढे येत आहे
