नवी दिल्ली (हवेलीनामा ऑनलाईन) देशाचा अमृत काळ हा पक्ष कार्यकर्त्यांसाठी कर्तव्य काळ असल्याचा प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आकांक्षात जिल्ह्यांमध्ये तसंच सरहद्दी जवळच्या गावांमध्ये पक्षयंत्रणा बळकट करण्यासाठी काम करण्याचा आवाहन त्यांनी केला भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी लड्डा यांच्या अध्यक्षपदाला पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी काल वृत्त माध्यमांना ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपा 2024 ची लोकसभा निवडणूक ही मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत मुंबईतील अनेक विकास कामांचा उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या रस्ते होणार आहे यावेळी मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचा उद्घाटन करून पंतप्रधान मेट्रो मधून प्रवासही करणार आहेत तत्पूर्वी कर्नाटक मध्ये यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *