लातूर (हवेलीनामा ऑनलाईन) लातूर जिल्ह्य़ातील निलंग्याजवळ बस अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंगळवारी सकाळी लातूर-पुणे-वल्लभनगर मार्गाची बस निलंगा बस डेपोतून पुण्याकडे जाण्यासाठी निघाली. बोरगाव काळे परिसरात बसचा राॅड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस खाली खड्ड्यात पडली. या बस अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील 14 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
बसचा अपघात होताच सर्व प्रवासी बाहेर आले. या सर्व लोकांना अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू झाले. या अपघातात बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
