पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत अंतर्गत भोर तालुक्यात कार्यावर असलेल्या पर्यवेक्षकेने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले

नाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पर्यवेक्षिका पदावर कार्यरत असणाऱ्या विद्या गणपत सोनवणे यांनी कार्यालयात झालेल्या ऑडिटच्या आनुषंगाने ऑडिटर ला देण्यासाठी आपल्याच कार्यालयातील सहकार्याकडे चार हजार रुपयाची लाच मागितली यावर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार दाखल केली तक्रारीवर विभागाकडून समांतर माहिती घेतल्यानंतर आज रोजी संबंधित लोकसेवक विद्या सोनवणे यांनी 4 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले त्यांच्याविरुद्ध पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे

ही कारवाई लाचलोचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *