पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) केसनंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थेऊर लोणीकंद महामार्गावर गतीरोधक टाकण्याची मागणी केसनंद ग्रामपंचायतीने केली असून याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग तसेच लोणीकंद पोलिस स्टेशनला केसनंद गावचे नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय(आबा) हरगुडे,केसनंदचे माजी सरपंच मिलिद(नाना)हरगुडे, उपसंपच रेखा बांगर,छावा गृपचे सचिन हरगुडे,विशाल तांबे यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना निवेदन दिले.
केसनंद येथील अष्टविनायक महामार्गवर केसंनद चौकात जिल्हापरिषदेची शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वाडे गावाकडे जाणारा रस्ता आहे मागील काही दिवसापासून सुरु असलेले अष्टविनायक रस्ते प्रकल्पा अंतर्गत या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता पुणे सोलापूर ते पुणे नगरला जोडणारा महामार्ग आहे रस्त्याचे काम झाल्यामुळे हजारो लहान मोठ्या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते.त्यामुळे रस्ता ओलांडून जाताना शाळेतील लहान मुले तसेच सरकारी दवाखान्यात जाणाऱ्या माहिला जेष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो रस्त्यावर धावणार्या वाहनाचा वेगाने जातात रस्त्यावर वाहतुक खुप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सदर रस्ता मोठा झालेला असल्यामुळे वाहनांचा वेग सुधा मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळे वारंवार अपघात होवुन जिवीतहानी होवुन वित्त हानी होत आहे महामार्गालगत जि.प.प्राथमिक शाळा पाटील वस्ती, जाधव वस्ती, सदगुरु पार्क, जोगेश्वरी मंदीर तसेच आवश्यक ठिकामी स्पीड ब्रेकर बसविणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थित खुप मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे. भविष्यता सुधा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर स्पिड ब्रेकर बसविणेत यावेत.अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे
