पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे शहरात गेल्या दिवसांपासून कोयता गँगची दहशत वाढताना दिसत आहे.या प्रकरणात गँगमधील अनेकांच्या मुसक्या आवळून देखील या गँगचा हैदोस कमी होत नाही.नुकतीच पुण्यात आणखी एक कोयता गँगने हल्ला केल्याची घटना समोर आली असून या घटनेत पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळता आहे..

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरजवळील मैदानावर झोपलेल्या जेष्ठ नागरिकावर तरुणांनी कोयत्याने हल्ला केला. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन या तरुणांनी पती-पत्नीवर कोयत्याने खूनी हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणात तक्रारदार सतीश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यांपूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काल रात्री हल्ला केला.

दाद्या बगाडे, दीपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांवर शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह शिवाजीनगर भागात एका मैदानावर रात्री झोपले असता टोळक्याने हातात कोयते घेऊन हल्ला करुन जोरजोरात आरडाओरड करून परिसरात दहशत माजवत हल्ला केला. या हल्ल्यात काळे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *