पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) जिल्ह्य़ात शासकीय परवानगीशिवाय चालू असलेल्या शाळावर कारवाई झाल्यानंतर देखील शहर आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांत १३ अनधिकृत शाळा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापकांसह मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या तीस शाळा बंद झाल्या आहेत. त्यासंदर्भात अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यापैकी काही शाळा मूळ परवानगीचे ठिकाण सोडून अन्यत्र चालू होत्या. यासह इतर शाळांना शासनाची परवानगी नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.त्यापैकी चार शाळांकडून चार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणीकाळभोर, आंबेगाव बुद्रुक; तसेच मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे-सागवडे, दत्तवाडी या शाळांचा समावेशअसून. दौंड तालुक्यातील दौंड, कासुर्डी, लिंगाळी रोड आणि पुरंदर तालुक्यातील वीर येथील इंग्रजी माध्यमाच्या १३ अनधिकृत शाळांचा यात समावेश आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *