पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)  वारंवार पैशांच्या मागणीला कंटाळून दोन प्रियकरांनी आपल्या प्रेयसीला तिच्याच गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केला , नारायणगाव पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २४ तासात गुन्हा उघडकीस आला आहे .सुनितादेवी शिवकुमार यादव (वय ३०) , (सध्या रा.माताजीनगर एम.आय.डी.सी नागापूर अहमदनगर , मुळ रा. मिरजावा जि.सुपौल बिहार) या महिलेचा खून करणारे शुभम मनोज गुळसकर (वय २२) (रा. बोल्हेगाव अहमदनगर ) आणि साथीदार मिथीलेश डोमी यादव (हल्ली रा. एम. आय. डी. सी वडगाव कांदळी, ता.जुन्नर, जि. पुणे, मूळ रा. मिरजावा, जि. सुपौल बिहार) यास अटक करण्यात आली आहे याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दितील वडगाव कांदळी, वडामाथा ता. जुन्नर, जि. पुणे येथील जमीन गट क १२२४ या चवळीच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला होता. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल,अपर पोलिस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी नेमलेल्या पोलीस पथकाने घटनास्थळी मिळून आलेली अहमदनगरची माव्याची पुडी व मयताचे अंगावरील ओढणीला सुविधा मार्केट नाव असलेले बारकोड स्टीकरवरून तपास करून शुभम गुळसकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार मिथीलेश यादव याचे मदतीने सुनीतादेवी हिचा ओढणीने गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे हे करीत आहे.हा तपास पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पृथ्वीराज ताटे , उपनिरीक्षक धनवे, विनोद धुर्वे, जगदाळे, पोलिस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, पोपट मोहरे, दिनेश साबळे, पो.कॉ सचिन कोबल, हासे, वैद्य, वाघमारे, ढेंबरे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *