पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) विकसित व विकसनशील राष्ट्रांच्या समावेश असलेल्या जी 20 या संघटनेची पदाधिकारी पुणे शहराच्या दौऱ्यावर असून त्यांना पौष्टिक पदार्थाचा आस्वाद देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे भारतीय खाद्य संस्कृती वैविध्यपूर्ण असल्याने याचा जागतिक पातळीवर प्रसार व्हावा या उद्देशाने या परिषदेच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांना न्याहारी तसेच जेवणात तृणधान्याचा समावेश करण्यात आला आहे या पदार्थाचा आस्वाद पाहुणे हॉटेलमध्ये निवासास आहेत त्या ठिकाणी याचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत
भारतीय भोजन पद्धतीमध्ये ज्वारी बाजरी नाचणी वरई राळा राजगिरी अशा तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश असतो जागतिक पातळीवरील विचार केल्यास भारतीय भोजन पद्धती अतिशय समृद्ध असल्याने या चा जागतिक पातळीवर प्रसार व्हावा या उद्देशाने जगाच्या वेगवेगळ्या देशातून आलेल्या परिषदेच्या सदस्यांना या मेजवानीवर ताव मारण्याची संधी उपलब्ध होत आहे तृणधान्यापासून बनवलेली उत्पादने आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्याने ही उत्पादने आमच्या देशात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा असे अभिप्रायही विविध देशांच्या प्रतिनिधींनी प्रदर्शन व स्टॉल असलेल्या ठिकाणी दिले आहेत
