पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)
राजगड पोपोलिसांकडू खेड शिवापुर टोलनाक्यावर नाकाबंदी करीत असताना एका कार मधून आठ किलो गांजा वाहतूक करत असताना जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार पोलिस हवालदार सचिन कदम यांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, मुंबई ते निप्पानी जाणारी हुंडाई वेरना गाडी एच. आर. ५१ बी. सी. २४२४ मधील काही प्रवासी गांजा या मादक पदार्थाची वाहतुक करीत आहेत.यावर पोलिसांनी पुणे ते सातारा राष्ट्रीय महामार्गावर खेडशिवापूर टोटोलनाक्याव गाडी तपासणी दरम्यान डिक्कित काळ्या रंगाच्या प्रवाशी बॕगमधून आठ किलो गांजा हा मादक पदार्थ त्यांची किंमत ८१९७०रु चा गांजा हस्तगत केला. या प्रकरणात १) ईस्माईल बाबु सय्यद, वय ३० वर्षे, रा. कनगल्ला, ता. बसवसर्कल जवळ, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, (चालक), २) सैफाली शब्बीर सुतार, वय २३ वर्षे, रा. निपानी, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ३) जैनुल गजबार मुल्ला, वय ३५ वर्षे, रा. सोलापूर दर्गा गल्ली, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ४) जिआऊल रेहमान रियाज मुजावर, वय २० वर्षे, रा. हरणापूरगड, ता. हुकेरी, जि.बेळगांव, राज्य कर्नाटक, ५) आजु अजगर अली खान, वय २१ वर्षे, रा. मानखुर्द, यांना ताब्यात घेतले
ही कामगिरी अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक,धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलिस.हवालदार. सचिन कदम, अजित माने, संतोष तोडकर, राहुल कोल्हे, पोलिस नाईक सागर कोंढाळकर,खेंगरे,अमित कांबळे, पोलिस शिपाई निलेश ओव्हाळ, चालक अमोल सूर्यवंशी, वार्डन पंकज शिंदे यांचे पथकाने केली आहे.
