लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज लोणी काळभोर यांच्यावतीने. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य सिताराम गवळी केले, रक्तदान शिबिराला अतिशय चांगलाच प्रतिसाद मिळाला.यात 25 माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद यांनी रक्तदान केले.
यावेळी प्राचार्य गवळी यांनी मार्गदर्शन केलेे,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आपण समाजाला काहीतरी देणे लागतो ह्याच उद्देशाने आज प्राचार्ये अभयकुमार साळुंखे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिराचे आयोजित केलेले आहे.
यावेळी उपस्थित प्रा. कचरे ए बी, प्रा. वडर एस एस,प्रा. दरेकर एन पी, प्रा. साळुंखे जे.बी., प्रा. काळभोर आर.सी., प्रा. तिकोणे जे ए, प्रा साळुंके एस.व्ही., प्रा. शेख एम.एम. पर्यवेक्षक श्री शिंदे एस.जे व. डॉ. जाधव, ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप सर्व शिक्षक वर्ग त्या उपस्थित होते
उद्या डॉक्टर अभय कुमार साळुंखे यांचा जन्मदिवस असल्याने दरवर्षी विद्यालयातील शिक्षक वृंद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे बौद्धिक खाद्य अर्थात वाचन संस्कृती जतन करण्यासाठी पुस्तकांची शिदोरी देतात याही वर्षी विद्यालयातील शिक्षक ग्रंथालयासाठी आपापल्या आवडीनुसार पुस्तके भेट देणार आहेत जी विद्यार्थ्यांसाठी वाचण्यासाठी उपलब्ध असतील.
