पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) गेल्या काही दिवसापासून पुणे शहर व परिसरातील उपनगरात कोयता गँगने हैदोस घातला असताना शहर पोलीसांनी

यावर मोठ्याप्रमाणात कारवाई केली तरीही अनेकजण समाजात दहशत पसरविण्यासाठी वारंवार काहीतरी कुरापत चालूच ठेवतात पुणे शहरालगत पश्चिम भागातील गोरे बुद्रुक, तालुका- हवेली, जिल्हा पुणे येथे अनिल अडके यांनी यश संजय जगताप यास मोटरसायकल हळू चालविण्याच्या सांगितलेल्या कारणावरून भांडणे केली.

पोलिसांकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, यश संजय जगताप याने त्याचे साथिदार १) नचिकेत संजय जगताप, २) सुरज जालिंदर ठाकूर, ३) पंकज दिलीप चव्हाण, ४) अक्षय चव्हाण उर्फ चपाती मोन्या, ५) अनुप शेलार, ६) निलेश सहा, ७) सागर कांतु पाटील, ८) अक्षय पारगे, ९) अनिकेत मोरे, १०) करण शिंदे, सर्व राहणार गोरे बुद्रुक, तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी बेकायदा गर्दी जमाव जमवून त्याच्याकडील मोठया लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून रस्त्याने येणारे-जाणारे लोकांना शिवीगाळी- दमदाट करून समाजात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण केले तसेच कविता नितीन तनपुरे व त्यांचे पतींना शिवीगाळ दमदाटी करून त्यांचा भाऊ अक्षय दत्तात्रेय नानगुडे यास जीवे मारण्याची धमकी देऊन तर आईला हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली अशी तक्रार हवेली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली

गुन्ह्यातील गांभीर्य व जनतेमध्ये दहशत पसरविणारा प्रकार असल्याने पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग भाऊसाहेब ढोले पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सदाशीव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, नितीन नाम, पोलीस उपनिरीक्षक आंबेकर, पोलीस हवालदार पाटसरकर, राणे, पोलीस नाईक दिपक गायकवाड, राजेंद्र मुंडे, रजनीकांत खंडाळे व पोलीस शिपाई मकसूद सय्यद यांचे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते.

या पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर, या गुन्हयातील निष्पन्न आरोपींपैकी सुरज लागींदर ठाकुर, वय १२ वर्षे, २) निलेश श्रीराम साह, वय २३ वर्षे, ३) अक्षय सुरेश चव्हाण, वय २३ वर्षे, ४) सागर कांतु पाटील, वय २२ वर्षे, ५) निकुन ऊर्फ अनिकेत विनायक भोर, वय २२ वर्षे, सर्व रा. गो-हे बुद्रुक, ता. हवेली, जि पुणे यांना अटक केलेली आहे. अटक केलेल्या टोळीतील सदस्यांवर यापुर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, खंडणी मागणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्हयात वापरलेले हत्यार एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आलेला आहे. यापुढे सुध्दा अशाप्रकारे दहशत माजविणारे गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *